राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण

माझा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्या तसेच खबरदारी घ्या.

चंद्रपूर : राज्यात कोरोनाचा (Corona virus) प्रकोप वाढला आहे. कोरोना सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. राज्यात सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. अनेक नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे. आता राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) यांना कोरोनाची  (corona) लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहे.


सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट करुन सांगितले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, माझा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्या तसेच खबरदारी घ्या. स्वतःला होम क्वारंटाईन करा. असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.