प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

चंद्रपूर येथील नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व्दारा जलशक्ती अभियांना अंतर्गत कॅच द रेन कार्यक्रम वेबिनार सिरीस जिल्ह्यातील युवकांना मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा युवा अधिकारी सुभेदार यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला होता.

    चंद्रपूर (Chandrapur).  नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व्दारा जलशक्ती अभियांना अंतर्गत कॅच द रेन कार्यक्रम वेबिनार सिरीस जिल्ह्यातील युवकांना मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा युवा अधिकारी सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

    सर्वप्रथम जल शक्ती अभियान अंतर्गत कॅच द रेन कार्यक्रम बद्दल जिल्हा युवा अधिकारी समशेर सुभेदार यांनी माहिती सांगून कार्यक्रमाचे उदघाटन केले. या प्रसंगी पाणी फौंडेशन तथा स्पर्श या संस्थेचे प्रशिक्षक दिलीप देवतळे, नाजीर कुरेशी, मंगेश दुबे, प्रिया गोमासे, सोनाली सोनारकर, मारोती बोबाटे सह इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    चंद्रपूर, कोरपना नागभीड, राजूरा, सावली, सिंदेवाही, वरोरा, गोंडपिपरी, जिवती, ब्रम्हपूरी, चिमूर , भद्रावती, मुल, पोंभुर्णा, या पंधरा तालुक्यातील युवकांना कॅच द रेन या विषयावर तज्ञ मार्गदर्शक पाणी फौंडेशन तथा स्पर्श या संस्थेचे प्रशिक्षक दिलीप देवतळे आणि नजीर कुरेशा यांनी मार्गदर्शन केले.

    या कार्यक्रमामध्ये पावसाळयाचा पूर्वी गाव स्तरावर कोण कोणती कामे जल संधारण संदर्भात करावी, त्याचे नियोजन कशा प्रकारे करावा. पाण्याचे ताळेबंद तयार करणे, वनराई बंधारे, शोष खड्डे, श्रमदान, उतारावरील बांध, शेत तलाव, बांधाची सफाई, रेनवॉटर हार्वेस्टिंग, लोकसहभाग, वृक्षारोपण, रेन गेज इत्यादी. ग्रामीण पाणी पुरवठा, देखभाल दुरूस्ती, विहीर तथा बोर पुनर्भरण, तसेच गावातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी विविध उपाय योजनेवर मार्गदर्शन करण्यात आले भूजल विकास यंत्रणा, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, कृषी विभाग सिंचाई विभाग इत्यादी विभागाव्दारा राबविण्यात येणारा विविध योजनांची माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाचे संचालक प्रिया गोमाचे यांनी केले तर आभार मंगेश दुबे यांनी मानले.