बाईकवरून स्टंट करणं पडलं महागात, दुसऱ्याला धडक देऊन एक फरार

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला हा स्टंट (Bike Stunt) एका नागरिकाच्या जीवावर बेतला. शहरातील मध्यवर्ती बँकेसमोर एका बाईक स्टंट करणाऱ्या युवकाने दुसऱ्या बाईकला धडक दिली. यामध्ये दुसरा बाईक चालक जखमी झाला. त्यानंतर या स्टंट करणाऱ्या युवकाने घटनास्थलावरुन पळ काढला.

चंद्रपूर : बाईकवरून अनेक प्रकारचे स्टंट करणे किंवा उपद्याप करणे, हे प्रसिद्धीसाठी चालू असतं. परंतु हेच स्टंट करणं एकाच्या जीवावर बेतलं आहे. ही घटना चंद्रपूर (Chandrapur ) जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवरील आहे. काही बाईक स्वारांनी स्टंट करून उच्छाद मांडल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला हा स्टंट एका नागरिकाच्या जीवावर बेतला. शहरातील मध्यवर्ती बँकेसमोर एका बाईक स्टंट करणाऱ्या युवकाने दुसऱ्या बाईकला धडक दिली. यामध्ये दुसरा बाईक चालक जखमी झाला. त्यानंतर या स्टंट करणाऱ्या युवकाने घटनास्थलावरुन पळ काढला. बाईक स्टंट करणाऱ्या युवकाचा ताबा सुटला आणि त्याने अन्य वाहनचालकाला धडक दिली. या धडकेत दुसरा वाहनचालक गंभीर जखमी झाला. मात्र, या जखमी वाहनचालकाला सोडून स्टंट करणारा युवक त्याला सोडून घटनास्थळावरुन पळून गेला.

या घटनेत दुसरा वाहनचालक गंभीर जखमी झाला. त्याला मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी बायकरचा स्टंट चित्रित करणाऱ्या सहकाऱ्यांनी ही घटना रेकॉर्ड करत चक्क व्हायरल केली आहे. जखमी अवस्थेतील वाहनचालकाला सोडून स्टंट बायकरने पळ काढतानाची दृश्ये देखील यात रेकॉर्ड झाली आहेत.