कोळसा व्यापाऱ्यावर भर चौकात गोळीबार

आज सायंकाळी तो नाका नंबर ३ येथे एका सलूनमध्ये गेला असता अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. सध्या घटनास्थळी तणावाची स्थिती आहे.

चंद्रपूर: कोळसा व्यापाऱ्याला भर चौकात अज्ञात आरोपींनी गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची थरारक घटना राजुरा शहरात आज सायंकाळी साडेसहा वाजता घडली. मृतकाचे नाव राजू यादव असे असून तो मूळचा उत्तरप्रदेशातील आहे. मागील अनेक वर्षांपासून तो राजुरा येथे कोळशाचा व्यवसाय करीत होता. आज सायंकाळी तो नाका नंबर ३ येथे एका सलूनमध्ये गेला असता अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. सध्या घटनास्थळी तणावाची स्थिती आहे.