कालबाह्य मीटरमुळे ग्राहकांना भुर्दंड; महावितरणचा भोंगळ कारभार

महाराष्ट्रात महावितरण या कंपनीतर्फे विद्यूत पुरवठा केला जातो. विद्यूत देयके न भरलेल्या नागरिकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याच्या सूचना उर्जा विभागामार्फत देण्यात आलेल्या आहेत.

    चंद्रपूर (Chandrapur).  महाराष्ट्रात महावितरण या कंपनीतर्फे विद्यूत पुरवठा केला जातो. विद्यूत देयके न भरलेल्या नागरिकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याच्या सूचना उर्जा विभागामार्फत देण्यात आलेल्या आहेत. परंतु, महावितरण जुन्या-कालबाह्य झालेल्या वीज मीटरच्या माध्यमातून विजेचा वापर नसतांना अतिरीक्त युनिट्सचा वापर दाखवून ग्राहकांकडून जास्तीचे वीज देयक आकारून वसूली करत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.

    चंद्रकांत कोतपल्लीवार यांनी म्हटले आहे की. माझ्या राहत्या घरचे विद्यूत मीटर मधील लीड लाईट घरातील कोणतीही विद्युत संयंत्रे चालू नसतांना अचानकपणे वेगाने चालु-बंद होत असल्याने मीटर मधील युनिटमध्ये वाढ होत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. अशावेळेस घराचे मेन स्विच बंद केले तरी मीटर मधील रीडींग वाढतच होते.

    महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास याबाबत माहीती दिली असता, त्यांचे म्हणण्यानुसार घरातील लाईव्ह आणि अर्थींग शॉट होत असल्यास मीटरमध्ये असा बिघाड निर्माण होऊ शकतो, त्यामूळे त्यांनी घरातील इलेक्ट्रिक फिटींग तपासून घेण्याबाबत सांगितले. परंतु, विद्युत मीटरकडून मेन स्विचकडे जाणारी लाईव्ह आणि न्युट्रल अशी दोन्हीही वायर्स मीटर पासून वेगळी केल्यानंतरही विद्यूत मीटर मधील एलईडी लाईट अतिशय वेगात ब्लींक होत असल्याचे आढळले. त्यानंतर विद्युत खांबावरून मीटर मध्ये येणारा वीजपूरवठा खंडीत करून पुर्ववत चालू केल्यानंतर विद्यूत मीटर मधील एलईडी लाईट सामान्यपणे ब्लींक होतो.

    असाच प्रकार मागील वर्षीसुद्धा जुन, जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात घडला होता. प्रत्येक वेळेस माझा विद्यूत वापर नसतांनासुद्धा मीटर मध्ये अचानकपणे बिघाड निर्माण होऊन वाढलेल्या रीडिंगच्या अनुषंगाने वाढीव विद्यूत देयक मला मिळत असल्याने मला विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे.