चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना मृत्यूने गाठला उच्चांक ; १६ मृत्यू, ६४० संक्रमित

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 194 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 640 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 32 हजार 592 वर पोहोचली आहे.

    चंद्रपूर (Chandrapur).  जिल्ह्यात मागील 24 तासात 194 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 640 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 32 हजार 592 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 454 झाली आहे. सध्या 4657 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 98 हजार 710 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 60 हजार 434 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

    आज मृत झालेल्यामध्ये गडचांदूर येथील 39 वर्षीय पुरुष, चंद्रपूर शहराच्या तुकुम येथील 55 वर्षीय पुरुष, ट्रेझरी कॉलनी येथील 87 वर्षीय महिला, बाबुपेठ येथील 55 वर्षे पुरुष, महाकाली वॉर्ड येथील 59 वर्षीय पुरुष, सिस्टर कॉलनी येथील 56 वर्षीय महिला, वोल्टास सागर कॉलनी, वरोरा येथील 58 वर्षीय पुरुष, नेताजी वॉर्ड चिमूर येथील 41 वर्षीय महिला, पांजरेपार चिमूर येथील 70 वर्षीय पुरुष, कृष्णानगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुष, बुटीबोरी नागपूर येथील 50 वर्षीय पुरुष, नागभीड येथील 73 वर्षीय महिला, हार्डोना ता. राजुरा येथील 37 वर्षीय पुरुष, राधे गाव तालुका गोंडपिंपरी येथील 45 वर्षीय पुरुष, नेहरू वॉर्ड चिमूर येथील 78 वर्षीय पुरुष व भद्रावती येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

    बाधित आलेल्या 640 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 217, चंद्रपूर तालुका 28, बल्लारपूर 18, भद्रावती 73, ब्रम्हपुरी 41, नागभीड 11, सिंदेवाही 22, मूल 38, सावली 10, पोंभुर्णा दोन, गोंडपिपरी सात, राजूरा 25, चिमूर 46, वरोरा 51, कोरपना 26, जीवती 18 व इतर ठिकाणच्या 7 रुग्णांचा समावेश आहे.