Corona eruption in senior social worker Baba Amte's Anandvan; Both died and 239 corona were found to be positive

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आनंदवनातच राहणारे आहेत. आनंदवन येथे आतापर्यंत १२०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. दररोज २५० लोकांची चाचण्या केल्या जात आहे. अचानक कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने आनंदवन कोरोनाचं हॉट-स्पॉट ठरत आहे.

    चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची कर्मभूमी असलेल्या आनंदवनात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दोघांचा मृत्यू तर २३९ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आनंदवनमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे.

    कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आनंदवनातच राहणारे आहेत. आनंदवन येथे आतापर्यंत १२०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. दररोज २५० लोकांची चाचण्या केल्या जात आहे. अचानक कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने आनंदवन कोरोनाचं हॉट-स्पॉट ठरत आहे.

    आनंदवनातून कुणालाही बाहेर पडू दिले जात नाही तसेच बाहेरच्यांना आत प्रवेश नाही. येथील रुग्णांवर आनंदवनातच उपचार केले जात आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.

    देशात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून बाहेरील लोकांना आनंदवनात प्रवेश बंदी आहे. त्यामुळे उपचारासाठी बाहेर गेलेल्या आनंदवनमधील एखाद्या व्यक्तीमुळे हा संसर्ग आत आल्याची आणि या ठिकाणी सर्व व्यवस्था सामुदायिक असल्यामुळे तो तातडीने पसरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.