माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन

कोरोना संसर्गाने महाराष्ट्रात थैमान घातलं असून करोनामुळं होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता करोनामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

    चंद्रपूर (Chandrapur).  कोरोना संसर्गाने महाराष्ट्रात थैमान घातलं असून करोनामुळं होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता करोनामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

    करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

    संजय देवतळे हे ४ वेळा वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हा ते काँग्रेस पक्षात होते. ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तसेच त्यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा कारभारासुद्धा सांभाळला होता.