chandrapur

जवळपास आठ महिन्यापासून बंद असलेल्या शाळा महाविद्यालय सुरू झाल्याने त्या भीतीदायक वातावरणामध्ये सुद्धा विद्यार्थ्यां मध्ये आनंद दिसून आला.

सावली.  मागील आठ महिन्यापासून कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यामध्ये सर्व शाळा महाविद्यालय सुद्धा बंद ठेवण्यात आले होते. परंतु शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर केला, परंतु ग्रामीण भागात त्याचा फारसा उपयोग झाला नाही. म्हणून शासनाने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्र वगळून शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासनाने दिलेल्या अटी व नियमाचे पालन करून शाळा महाविद्यालय सुरू करण्यात आले.

शासनाने निर्बंधित केल्यानुसार सामाजिक अंतर ठेवून वर्ग घेण्यात आले. त्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना संसर्गाची तपासणी करण्यात आली. शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. जवळपास आठ महिन्यापासून बंद असलेल्या शाळा महाविद्यालय सुरू झाल्याने त्या भीतीदायक वातावरणामध्ये सुद्धा विद्यार्थ्यां मध्ये आनंद दिसून आला. संसर्गासाठी शासनाने ज्या अटी व निर्बंध घातलेले आहेत त्यानुसार शाळा महाविद्यालय सुरू ठेवल्यास आमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यामुळे शाळा नियमित सुरू ठेवण्यात याव्यात अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.