लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी, सामाजिक अंतराचा फज्जा

कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी त्रिसूत्री नियम सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक अंतर. मात्र नागरिकांकडून या सामाजिक अंतराचा फज्जा होतांना दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यात सुट दिली आहे. 

  चंद्रपूर (Chandrapur).  कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी त्रिसूत्री नियम सांगण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक अंतर. मात्र नागरिकांकडून या सामाजिक अंतराचा फज्जा होतांना दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यात सुट दिली आहे; मात्र नागरिक विनाकराण बाहेर पडत असून या वेळेत बाजारात सामाजिक अंतर पुर्णत: विसरून गर्दी करताना दिसून येत आहे. सोबतच आता लसीकरण केंद्रावरही लस घेण्याकरिता येत असलेल्या नागरिकांकडून सामाजिक अंतराचा फज्जा होताना दिसून येत आहे.

  लसीकरण करण्याकरिता नागरिक लसीकरण केंद्रावर जात आहे, मात्र लसीचा तुटवडा भासत असल्याने नागरिक चिंतेत आहे. त्यामुळे सर्वाना आधी त्यांना लस मिळावी या हेतुन नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करतांना दिसत आहे. लसीकरण केंद्रावर रोज नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसुन येत आहे. सकाळ होताच नागरिक लसीकरण् केंद्रावर एकत्रित होत आहे आणि लसीकरणाची वाट पाहत आहे. एकाच वेळी नागरिक गर्दी करित असल्यामुळे आधी कोणता व्यक्ती आला, आधी कुणाचा नंबर आहे हे माहित होत नसून नागरिकांमध्ये अफरातरफी चे चित्र काही वेळेस नजरेस पडते. सोबतच काही वेळा रांगेत धक्कामुक्की करत आधी माझा नंबरआहे असे म्हणत वाचावाची करताना ही दिसत आहे.

  चंद्रपूर शहरात जवळपास सगळ्याच वार्डात लसीकरण केंद्र स्थापित करण्यात आले आहे. येथे लसीकरणाची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु नागरिकांमध्ये वाचावाची चे चित्र हमखास दिसुन येत आहे. सोबतच आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर असतांना त्यांच्यासोबत शिवीगाळ करने, सुरक्षा रक्षकाला धमकवने हे प्रकार ही समोर आले आहे.

  जिल्ह्यात 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. या समजुतदार नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करने हे समजण्यापलीकडे आहे. आता तर 1 मे पासुन 18 वर्ष व त्यावरील नागिरकांचे लसीकरणाला सुरूवात होत आहे. त्यामुळे येत्या काळात हेच चित्र बघावयास मिळणार का असा सवाल उपस्थित झाला आहे.जिल्ह्यात जवळपास 16 लाख 41 हजार 829 नागरिकांचे लसीकरण होणार आहे. यात 60 वर्षावरील 2 लाख 24 हजार 296 नागरिकांचा समावेश आहे. 45 ते 60 वयोगटातील 4 लाख 48 हजार 586 नागरिक, 25 ते 44 वयोगटातील 6 लाख 84 हजार 296 नागरिक, 18 ते 24 वयोगटातील 2 लाख 84 हजार 852 नागरिक आहेत. जिल्हयात आता 175 केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे. या केंद्राना वाढवुन आता 237 करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

  मनपाने संयम राखण्याचे केले आवाहन
  लसीकरण केंद्रावर गर्दी पाहता व सामाजिक अंतराचा होत असलेला फज्जा पाहता मनपाने नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य कर्मचारी एकदिवसाची ही सुट्‌टी ने घेता निरंतर काम करित आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करून प्रशासनाला सहयोग करावे. सोबतच लसीकरण सर्वाना करण्यात येणार असल्याचे यावेळी मनपा कडुन सांगण्यात आले आहे.

  आरटीपीसीआर केंद्रावर गर्दी
  कोरोना के लक्षण दिसणारे नागरिक आरटीपीसीआर चाचणी करण्याकरिता येथील जिल्हा सामान्य रूग्णालया जात आहे. यावेळी येथे चाचणी करण्यात येणारे नागरिकांमध्येही सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या आरटीपीसीआर चाचणी दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येत असून नागरिक जवळजवळ उभे असल्याचे समोर आले आहे.