खाण परिसरातील मॉड्युलर टॉवर हटविला; प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात्मक पवित्र्याचा धसका

कर्नाटका कार्पोरेशन लि. कंपनीच्या बरांज कोळसा खाण परीसरात कोळसा उत्खनन व कोळसा वाहतुक नियंत्रित करण्यासाठी मॉड्युलर टॉवर उभारण्यात आले होते. या टॉवरच्या माध्यमातून येथील कोळसा उत्खनन व कोळसा वाहतूक नियंत्रित केल्या जात होती. परंतु या खाणीतील विविध समस्यांना घेऊन कामगार व प्रकल्पग्रस्तांनी याच टॉवरवर चढून विरूगिरी केली. प्रकल्पग्रस्तांच्या इशाऱ्यानंतर खाणीतील मॉड्युलर टॉवर हटविण्यात आले.

    भद्रावती (Bhadravati).  कर्नाटका कार्पोरेशन लि. कंपनीच्या बरांज कोळसा खाण परीसरात कोळसा उत्खनन व कोळसा वाहतुक नियंत्रित करण्यासाठी मॉड्युलर टॉवर उभारण्यात आले होते. या टॉवरच्या माध्यमातून येथील कोळसा उत्खनन व कोळसा वाहतूक नियंत्रित केल्या जात होती. परंतु या खाणीतील विविध समस्यांना घेऊन कामगार व प्रकल्पग्रस्तांनी याच टॉवरवर चढून विरूगिरी केली. प्रकल्पग्रस्तांच्या इशाऱ्यानंतर खाणीतील मॉड्युलर टॉवर हटविण्यात आले.

    2 नोव्हेंबर 2018 रोजी सतत दीड दिवसापर्यंत ऐन दिवाळीच्या दिवशी कामगार नेते राजू डोंगे यांनी कामगारांच्या थकीत वेतनाच्या न्याय हक्क मागण्यासाठी याच टॉवरवर चढून विरूगिरी गेली. त्याचा परिणाम म्हणून खा. बाळू धानोरकर यांच्या मध्यस्थिने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावला.

    सदर खाण प्रकल्पासंबंधी यासर्व आंदोलनाचा पूर्व अनुभव लक्षात घेता, तसेच अलिकडेच घडलेल्या घडामोडी पाहता प्रशासनाने आगामी काळात उध्दभवणाऱ्या आंदोलनाचा सामना करण्याकरीता उपाययोजना म्हणूनच बरांज कोळसा खाण परीसरातील मॉडयुलर टॉवर हटविल्याची कामगार समुहात चर्चा आहे.