डॉ. शीतल आमटे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात आमटे कुटुंबीय गैरहजर; कारण आले पुढे

यावेळी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टबाबत आणि आमटे कुटुंबीयांच्या गैरहजेरी बाबत करजगी परिवाराने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, शीतल यांच्या रुपाने आनंदवनशी संबंध जोडल्या गेल्याची भावूक प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

चंद्रपूर. प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची श्रद्धांजली सभा आज पार पडली. मात्र शीतल आमटे यांच्या शोकसभेला आमटे कुटुंबीय उपस्थित न राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

डॉ.मंदाकिनी आमटे, अनिकेत आमटे यांना करोना झाल्यामुळे डॉ.प्रकाश आमटे यांच्यासह सर्वजण विलगीकरणात आहेत. त्यामुळे हे सर्वजण या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही. तर, अनिकेत यांच्या पत्नी समीक्षा आमटे श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, अशी देखील माहिती मिळाली आहे.

या श्रद्धांजली सभेला आनंदवनाशी संबंधित अनेकांनी प्रत्यक्षपणे तर काहींनी झूम  ॲपद्वारे आपली उपस्थिती नोंदवली होती. मात्र आमटे कुटुंबातील कुणीही शीतल आमटे यांच्या श्रद्धांजली सभेसाठी हजर राहिले नसल्याचे दिसून आले होते.