डाॅ. शीतल आमटे
डाॅ. शीतल आमटे

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूप्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चैकशीत शीतल यांचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे झाल्याचे समोर आले आहे; परंतु त्यांनी स्वतःला नेमके कोणते इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती, याचा खुलासा होणे बाकी आहे. या संपूर्ण प्रकरणाचेे गुपित उलघडण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे एक विशेष पथक नेमण्यात आले आहे.

चंद्रपूर (Chandrapur). डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूप्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत शीतल यांचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे झाल्याचे समोर आले आहे; परंतु त्यांनी स्वतःला नेमके कोणते इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती, याचा खुलासा होणे बाकी आहे. या संपूर्ण प्रकरणाचेे गुपित उलघडण्यासाठी नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक नेमण्यात आले आहे.

समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात असलेल्या शीतल यांचा मृत्युमुळे आनंदवनातील गुपितांना घेऊन अनेक चर्चांचे पेव फुटले आहे. डाॅ. शीतल यांनी ३० डिसेंबर रोजी विषारी इंजेक्शन घेतल्यानंतर त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र पोलिसांनी शीतल आमटे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. चंद्रपूरच्या आनंदवन ग्रामपंचायत विभागात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी नागपूरहून विशेष तपास पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. सध्या तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती देणं शक्य आहे अशी माहिती चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली.

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला होता. शीतल आमटे या सर्व वादाच्या केंद्रस्थानी होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. त्या मानसिक तणावात असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते.