प्रतिकात्मक  फोटो
प्रतिकात्मक फोटो

सासऱ्यांचा (Father in law) मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना अपघातात (Road Accident) जावयाचा मृत्यू (Son in law death) झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्यानं मायलेकी विधवा (Widow) झाल्या आहेत.

    चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सासऱ्यांचा (Father in law) मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना अपघातात (Road Accident) जावयाचा मृत्यू (Son in law death) झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्यानं मायलेकी विधवा (Widow) झाल्या आहेत.

    या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञान वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

    हिरापूर येथील रहिवासी असणारे किसन चिडांम यांचा शनिवारी सायंकाळी शेतावर काम करताना अचानक मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर नातेवाईक गावातील एक पिकअप वाहन भाड्यानं घेऊन किसन यांचा मृतदेह चिमूर याठिकाणी घेऊन जात होते.

    दरम्यान चिमूर कानपा महामार्गावरून जात असताना शंकरपूर याठिकाणी त्यांच्या वाहनाला एका अज्ञात ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह वाहनातील सहा लोकं गंभीर जखमी झाले.

    स्थानिक लोकांनी जखमींना त्वरित ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रविवारी पहाटे चारच्या सुमारास जावई शंकर खंडाते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाहनातील अन्य जखमी रुग्णांना रविवारी सकाळी पुढील उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आलं आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुहेरी आघातामुळे मायलेकीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.