आधी प्रेम, नंतर लग्नास प्रेयसीचा नकार, प्रियकराच्या ‘या’ कृत्याने समाजमन झाले संतप्त

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात (In Ballarpur city) विकृत मानसिकता असलेल्या युवकाने (a shocking act by a youth) केलेला धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. प्रेयसीवर अत्याचार करून युवकाने सोशल मीडियावर बनावट अकाऊंट आयडी (a fake account ID) तयार केला आणि या अत्याचाराचा व्हिडिओ अपलोड केले.

    चंद्रपूर (Chandrapur). जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात (In Ballarpur city) विकृत मानसिकता असलेल्या युवकाने (a shocking act by a youth) केलेला धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. प्रेयसीवर अत्याचार करून युवकाने सोशल मीडियावर बनावट अकाऊंट आयडी (a fake account ID) तयार केला आणि या अत्याचाराचा व्हिडिओ अपलोड केले. या प्रकाराने तरुणीला धक्काच बसला. त्यानंतर तिने हा प्रकार घराच्यांना सांगून पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर प्रियकराला बेड्या पडल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर (Ballarpur in Chandrapur district) येथे ही घटना घडली आहे.

    बल्लारपूर शहरातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय युवक आणि 29 वर्षीय युवती यांच्यात प्रेमसंबंध होते. ते काही काळ चालले. मात्र आरोपी युवक पीडित मुलीचा जातीवरून सतत अपमान करत होता. या अपमानाने या लग्नाला नकार देण्याचा निर्णय युवतीने बोलून दाखविला. युवक या नकाराने बिथरला. त्याने मुलीचे घर गाठत स्वतःच्या हाताची नस चाकूने कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माझे तुझ्यावर प्रेम आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. प्रियकराच्या या कृतीमुळे ती मुलगी घाबरून गेली आणि आरोपीसोबत इच्छा नसताना काही ठिकाणी दुचाकीवर त्याच्यासोबत गेली.

    27 मे रोजी त्याने चंद्रपुरात देवदर्शनाचा बहाणा करत तिला बल्लारपूर शहरालगत कारवा जंगलात नेत अतिप्रसंग केला. तर 1 जून रोजी याच कारवा जंगलात नेत अत्याचारही केला. धक्कादायक बाब म्हणजे त्याने तिचे बळजबरीने अत्याचाराचे व्हिडिओ आणि फोटो देखील काढले. आपली प्रेयसी लग्नाला नकार देत असल्याचा राग आरोपीच्या मनात होता. बदला घेण्यासाठी त्याने तिच्या वाढदिवशी मोठे गिफ्ट देत असल्याचे मुद्दाम सांगितले आणि अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.

    आरोपीने चक्क अत्याचाराचे फोटो-व्हिडिओ आशिष मल्होत्रा नामक बनावट सोशल मीडियावर खाते तयार करत त्यावर अपलोड केले. आणि मुलीला टॅग केले. व्हिडिओ आणि फोटो बघताच तिला शॉक बसला. ती हादरुन गेले. हा प्रकार तिन कुटुंबीयांनाही सांगितला. तिचे कुटुंबीयही हादरुन गेले. त्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सायबर तपास करत पुरावे गोळा केले. सर्वप्रथम सोशल मीडियावरील सर्व आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ काढून टाकण्यात आले. आणि आरोपी युवक सन्मुखसिंग बुंदेल याला अटक केली.

    पोलीस पथकाने पीडित युवतीला घटनास्थळी नेत रीतसर पंचनामा केला आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहितेचा कलम 376, अट्रोसिटी कायदा, सायबर गुन्ह्यासंदर्भात कलमे दाखल केली आहेत. पोलीस या धक्कादायक घटनेचा अधिक तपास करत आहेत.