चंद्रपुरात पाच दारूतस्करांना अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त; अवैध दारूविक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण

शहरातील रामनगर चौकात (Ramnagar Chowk in the city) नाकाबंदी (blocking) करीत पहिली कारवाई करण्यात आली. एका चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली असता शक्ती संजू शाह (३७) , लक्ष्मीनारायण पुतान परसराम (३५), रवींद्र विजय गुजर (३०) हे तिघे वाहनात होते. वाहनात विदेशी दारूचा साठा आढळून आला.

    चंद्रपूर (Chandrapur).  शहरातील रामनगर चौकात (Ramnagar Chowk in the city) नाकाबंदी (blocking) करीत पहिली कारवाई करण्यात आली. एका चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली असता शक्ती संजू शाह (३७) , लक्ष्मीनारायण पुतान परसराम (३५), रवींद्र विजय गुजर (३०) हे तिघे वाहनात होते. वाहनात विदेशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहन आणि दारूसाठा (Police seized vehicles and liquor) असा मिळून सुमारे १० लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    रेल्वेस्थानक चौकात दुसरी कारवाई करीत साजिद इसाक कुरेशी (३१) याला अटक केली. हा ऑटोने दारूची तस्करी करीत होता. दीड लाख रुपये किमतीची देशी दारू, बिअर असा सुमारे दोन लाख चार हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जनता कॉलेज चौकात तिसरी कारवाई करण्यात आली. चारचाकी वाहनातून दारूतस्करी केली जात होती. पोलिसांनी वाहनाची तपासणी करीत एक लाख रुपये किमतीची देशी दारू आणि वाहन असा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सोबतच चालक ईश्वर रमेश वाघमारे (२६) याला अटक केली.