abi fraud customer service center in chandrapur

  •  जनधन योजनेच्या नावाखाली ग्राहकांची लूट
  • म्हणे सरकारकडून थेट पाचशे खात्यात जमा होणार
  • स्टेट बँक ऑफ इंडिया चे अधिकारी कुंभकर्णी झोपेत
  • सोशल डिस्टनसिंग चा फज्जा

वरोरा. ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही बँकांनी बँक मित्र म्हणून कमिशन तत्वावर  ग्राहक सेवा केंद्रा ची उभारणी केली मात्र कमिशन व्यतिरिक्त अधिक कमावण्याच्या लालसेपोटी  विविध युक्त्या करून ग्राहकांची लूट केल्या जात असल्याचा प्रकार ग्रामीण भागात होत असल्याचे दिसून येत आहे या कडे मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्याचे वचक नसल्याचे दिसून येत आहे. बोर्डा चौकात लॉक डाऊनच्या मागील अनेक महिन्यापासून एसबीआय ग्राहक सेवा केंद्रात तुफान गर्दी सुरू आहे, ग्रामीण व शहरी महिलांची इथे मोठी उपस्थिती नेमकी कशामुळे आहे हे बघितले तर पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत प्रत्त्येक व्यक्तींच्या बैंक खात्यात ५००/- रुपये मिळेल या आशेने लोक जनधन योजनेचे खाते काढण्यासाठी गर्दी करीत करीत आहे.


आता कोरोनच्या या माहामारीत एकीकडे जनता रोजगार गेल्याने व कामधंदा बंद झाल्याने त्रस्त असून शेतीमध्ये सुद्धा आता सोयाबीन आणि कपाशी वर रोगराई आल्याने हवालदिल झालेली असताना आता त्या जनतेला जनधन योजनेचे ५०० रुपये मिळणार म्हणून प्रत्तेकी ३० रुपये घेवून फसवणूक करण्याचे काम एसबीआय बैंक ग्राहक सेवा केंद्राचे एजंट करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे एजंट गावा गावात जाऊन जन – धन योजनेच्या नावाखाली तुमच्या अकाऊटमधे ५०० रुपये महिन्याचे मिळनार अशी खोटी प्रलोभने देउन ३० – ३० रुपये घेऊन फॉर्म भरुन घेत आहेत. खरं तर कोरोनाच्या महामारीमुळे सरकारी यंत्रणा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतीत आहे व त्यासाठी लॉक डाऊन करून जनतेला या कोरोना पासून काळजी घेवून दक्ष राहण्याचे आव्हान करीत आहे तर दुसरीकडे स्टेट बैंक ग्राहक सेवा केंद्राचे एजंट  गावा गावात जाऊन जन – धन योजनेच्या नावाखाली लोकांना एकत्र करत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडविला जात आहे  व त्यांच्याकडून प्रत्तेकी ३०/- रुपये घेतात विशेष म्हणजे जनधन योजनेसाठी ग्राहकांकडून कुठलेही पैसे घेण्याचे आदेश नसतानाही चक्क गरीब व बेजार ग्राहकांकडून पैसे उखडल्या जात आहे या आधी ही असेच कॅम्प घेण्यात आले होते, असे असतानाही स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वरोरा शाखेचे अधिकारी कमालीचे गप्प बसल्याचे दिसत आहे. अधिकाऱ्यांचे तर साठे लोटे तर नाही ना असा ही सवाल जनते कडून होत आहे या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ग्राहक सेवा केंद्र चालकांवर  आपत्ती व्यवस्थापन व महामारी कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.