चंद्रपुरातील प्राचीन विहिरी गुगलवर; प्रशासनाचे संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात पायर्‍या असलेल्या ऐतिहासिक विहिरी (historical wells) मोठया प्रमाणावर आहेत. यातील काही दुर्लक्षित, तर काही सुस्थितीत आहेत. या विहिरींचे संवर्धन (Conserving these wells) केल्यास अनेक ठिकाणांवरची पाण्याची समस्या (solve the water problem) सुटू शकते.

    चंद्रपूर (Chandrapur). जिल्ह्यात पायर्‍या असलेल्या ऐतिहासिक विहिरी (historical wells) मोठया प्रमाणावर आहेत. यातील काही दुर्लक्षित, तर काही सुस्थितीत आहेत. या विहिरींचे संवर्धन (Conserving these wells) केल्यास अनेक ठिकाणांवरची पाण्याची समस्या (solve the water problem) सुटू शकते. आता याच प्राचीन विहिरी एका क्लिकवर तुम्ही बघू शकणार आहेत. बारव बचाव आंदोलनाचे प्रणेते रोहन काळे यांच्या पुढाकारातून प्राचीन विहिरी गुगलच्या नकाशावर आल्या आहेत.

    पोंभुर्णा येथे राजराजेश्वर मंदिर परिसरात पायऱ्या असलेली विहीर आहे. ही विहीर आता गुगलच्या नकाशावर आली आहे. आठव्या शतकात तंजावर राजाने पोंभुर्णात विहिरीचे दगडांनी बांधकाम केले. त्या विहिरीत उतरून पाणी पिण्यासाठी पायऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. कित्येक वर्षांपासून याच विहिरीच्या पाण्यातून पोंभुर्णावासींची तहान भागविली जात होती. मात्र, काही काळापासून या विहिरीचे पाणी वापरणे कमी झाले. त्यामुळे विहिरीची दुर्दशा झाली होती.

    या विहिरीचे जतन करावे, यासाठी ऐतिहासिक वारसा संवर्धन समिती व तत्कालीन नगराध्यक्ष स्व. गजानन गोरंटीवार यांनी प्रयत्न केले. विविध विभागांशी त्यांनी वारंवार पत्रव्यवहार केला. याला यशा आले. तत्कालीन अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. आज ही विहीर चांगल्या अवस्थेत आहे.

    आपला ऐतिहासिक वारसा हा गुगलवर आल्याने पर्यटकांना शोधत राहावे लागणार नाही. एकाच क्लिकवर सर्व ऐतिहासिक विहिरींची माहिती आपल्याला मिळणार आहे. जिल्ह्यातील भद्रावती, चंद्रपूर, नागभीड, चिमूर आणि नागभीड येथील प्राचीन विहिरीही गुगलवर आणण्याच्या दृष्टीने बारव बचाव आंदोलनाचे प्रयत्न सुरू आहेत.

    विहिरींचे व्हावे संवर्धन
    बारव बचाव आंदोलनाचे प्रणेते रोहन काळे यांनी या विहिरीचे गुगल मॅपिंग केळे. आता ही विहीर जगाच्या नकाशावर आली. यामुळे आता कुणालाही ही विहीर गुगलच्या माध्यमातून बघता येणार आहे. पायऱ्या पद्धतीने बांधकाम केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील १५ ते २० विहिरी आहेत. या सर्व विहिरींचे गुगळ मॅपिंग झाले आहेत. यात चिमूर तालुक्‍यातील दोन विहिरी आहेत. त्याही गुगलवर आल्या आहेत. मात्र, या विहिरींचे संवर्धन झाले नाही. त्या सर्व विहिरींचे पोंभुर्णा शहरात असलेल्या विहिरीसारखे संवर्धन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.