सुधीर मुनगंटीवारांच्या विकासकामांचे राज्यपालांनी केले कौतुक ! ; जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देणारी पुस्तिका दिली भेट

या पुस्तिकेत मुनगंटीवार यांच्या भगीरथ प्रयत्नाने वेळेच्या आत पूर्ण झालेल्या व चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या ऐतिहासिक अनेक महत्त्वाकांशी प्रकल्पांची माहिती क्यू आर कोडसह करून दिली. क्यू आर कोड स्कॅन करून त्याचे अवलोकन राज्यपालांनी केले.

चंद्रपूर : भाजपाच्या एका शिष्टमंडळाने विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची ताडोबा व्याघ्रप्रकल्पात भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालाना चंद्रपूर जिल्हा व महानगराच्या विकासकामांची माहिती करून देत “सिंहावलोकन” पुस्तिका भेट दिली. पुस्तिकेचे अवलोकन करून राज्यपालांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाचे कौतुक केले.

राज्यपांलाची टायगर सफारी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सलग ३दिवस ताडोबा व्याघ्रप्रकल्प भ्रमण करीत चंद्रपूरचे वैभव अनुभवले.भाजपच्या शिष्ठमंडळाने माजी वित्तमंत्री व विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देणारी “सिंहावलोकन” पुस्तिका भेटस्वरूप दिली.

या पुस्तिकेत मुनगंटीवार यांच्या भगीरथ प्रयत्नाने वेळेच्या आत पूर्ण झालेल्या व चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या ऐतिहासिक अनेक महत्त्वाकांशी प्रकल्पांची माहिती क्यू आर कोडसह करून दिली. क्यू आर कोड स्कॅन करून त्याचे अवलोकन राज्यपालांनी केले.

व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकल्प अनुभवता आल्याने राज्यपालांनी स्तुती सुमने उधळली. सैनिकी शाळा,बांबू अकादमी, बोटॅनिकल गार्डन, ए पी जे कलाम गार्डन,विसापूर येथील जागतिक दर्जाचे स्टेडियम, आगारझरी येथील बटरफ्लाय गार्डन व पुस्तिकेतील मुनगंटीवार यांच्या क्यू.आर. कोड कल्पनेचीही त्यांनी स्तुती केली. यावेळी त्यांनी चंद्रपूरचा इतिहासही जाणून घेतला.

या शिष्टमंडळात महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,दत्तप्रसंन्न महादाणी व शैलेंद्रसिंह बैस यांचा समावेश होता.