छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी नुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.

  चंद्रपूर (Chandrapur).  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी नुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. यावेळी कोरोना संसर्गाची खबरदारी घेऊन व कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

  शिवसेनेतर्फे रुग्णांना फळाचे वाटप
  बल्लारपूर. शहरातील तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नगर परिषद चौक बल्लारपूर परिसरातील उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. तालुका प्रमुख प्रकाश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाबा शाहू शहरप्रमुखांच्या नेतृत्वात प्रशासनाने निर्देशित केलेल्या कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पित करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय फळ वितरण करण्यात आले. त्यानंतर नगर परिषद चौकात शरबत व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

  कार्यक्रमाला प्रामुख्याने कल्पना गोरघाटे, सुवर्णा मुरकुटे, ज्योती गहलोत, नगरसेविका रंजीता बेरे, कमलेश बुग्गावार, प्रदीप गेडाम, प्रभाकर मुरकुटे, शेख युसुफ, प्रणय काकडे, रसिया, रामू मेदवार, फिरोज खान, गौरव नादावर, बॉबी कडासी, उमेश कुंडले, सोनू श्रीवास, प्रवीण मेश्राम, नीरज यादव, सुरेंद्र संधू, आशिष, प्रदीप, राहुल, बादल, कृष्णकांत, प्रकाश, रमेश इत्यादींचा समावेश होता.

  घुग्गुस येथे उत्साह
  घुग्घुस. येथील शिवसेना व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव कमिटीच्यावतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार गांधी चौक येथे घुगुस शिवसेना शहर प्रमुख बंटी घोरपडे, युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, प्रभारी शहर प्रमुख सतिश बोंडे, यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला अभिवादन केले.