गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांना चंद्रपूर वीज केंद्राकडून गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईद्वारे दरवर्षी राज्यातील विविध आस्थापणात कार्यरत कामगारांची...

    चंद्रपूर (Chandrapur).  महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांना चंद्रपूर वीज केंद्राकडून गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईद्वारे दरवर्षी राज्यातील विविध आस्थापणात कार्यरत कामगारांची त्यांनी आपले नोकरीचे कर्तव्य सांभाळून केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार दिला जातो.

    मुंबई येथे मागील 2015 व 2017 च्या पुरस्काराचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व राज्यमंत्री बच्चू कडू , कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर विज केंद्राचे तीन कर्मचारी यांचा समावेश आहे. याचीच दखल घेऊन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांचे हस्ते चंद्रपूरचे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त धर्मेद्र कन्नाके, दिनकर मशाखत्री व बळवंत ठाकरे यांचा वीज केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.

    महानिर्मितीच्या चंद्रपूर वीज केंद्राने वीज निर्मितीचा उच्चांक गाठल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार संघटनेच्यावतीने मुख्य अभियंता पंकज सपाटे यांचा शुभेच्छा पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी वीज केंद्राचे कामगार कल्याण अधिकारी आनंद वाघमारे, मनसे संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र रहाटे, शाखा सचिव देवराव कोंडेकर, राजा वेमुला, धनराज सपकाळे व सुनिल पाऊनकर ईत्यादीची उपस्थिती होती.