भाजपा नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील, परंतु…. ‘या’ नेत्याने केली टीका

'भाजपा नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील, परंतु भाजपा नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली' , ते योग्य केले. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल- विजय वडेट्टीवार

    चंद्रपूर:पूजा चव्हाण आत्महत्येनंतर राज्यातील राजकारणातचांगलंच तापलं आहे. आत्महत्येच्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा समावेश असल्याच्या आरोपामुळे त्यांना चांगलेच धारेवर धरले जात आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या राजीनामा घेतल्याची माहिती समोर येत आहे. परंतु संजय राठोड हे मीडिया ट्रायलचे बळी ठरलेत असे विधान काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.

    ‘भाजपा नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील, परंतु भाजपा नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली’ , ते योग्य केले. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
    संजय राठोड प्रकरणात विरोधी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली, प्रकरणाचा गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाक यांनी राठोडांचा राजीनामा घेतल्याची माहिती आहे. मात्र संजय राठोड मीडिया ट्रायलचे बळी ठरलेत असं विधान काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.