चंद्रपूरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, एकाचा मृत्यू

  • पिकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याशेजारी असणाऱ्या घराच्या अंगणात घुसली. परंतु या गाडीचा वेग जास्त असल्याने अंगणात असलेल्या तीन चुमकल्यांपैकी एकाचा मृत्यू तर दोन जणं गंभीर जखमी झाले आहेत.

चंद्रपूर : चंद्रपूरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आष्टी-गोंडपिंपरी मार्गावर काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याशेजारी असणाऱ्या घराच्या अंगणात घुसली. परंतु या गाडीचा वेग जास्त असल्याने अंगणात असलेल्या तीन चुमकल्यांपैकी एकाचा मृत्यू तर दोन जणं गंभीर जखमी झाले आहेत.

अंगणात लहानमुलांच्या किंकाळ्यांचा आवाज आल्याने घरातील माणसे आणि आजुबाजूचे ग्रामस्थ अंगणाच्या दिशेने धावत सुटले. त्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला असता एक चिमुकली गाडीच्या धक्याने बेशुद्ध पडलेली दिसून आली. या भीषण अपघातानंतर या तीन चुमकल्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु या अपघातात दुर्दैवीपणे एकाचा मृत्यू झाला असून दोन जणं गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी गोंडपींपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.