
पक्षाच्या विश्वासाला खरे उतरणे ही आपली जबाबदारी असते असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रपूर शहर येथील आढावा बैठकीत केले. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा दुसरा दिवस असून आज चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार आहेत.
चंद्रपूर : लोकांच्या मनात पक्षाविषयी आस्था निर्माण करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. पक्षाने मोठ्या अपेक्षा ठेऊन आपल्याला पदे दिलेली असतात त्याप्रमाणे आपण रिझल्ट द्यायला हवा. पक्षाच्या विश्वासाला खरे उतरणे ही आपली जबाबदारी असते असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रपूर शहर येथील आढावा बैठकीत केले. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा दुसरा दिवस असून आज चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार आहेत.
पदाधिकाऱ्यांनी काम करणारे व्यक्ती आपल्या कार्यकारिणीत घ्यावे, त्यांना कार्यक्रम द्यावा. नुसती गर्दी करून उपयोग नाही विचारांचा प्रचार करणारे लोक आपल्याला हवेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे लोक कुणाचे होत नाही, जिथे सत्ता असेल तिथे ते लोक जात असतात मात्र आपल्याला असे लोक नकोत असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
कालपासून अनेक निवदने मिळाली असून ती जिल्हाधिकाऱ्यांना सुपुर्द केली आहे. लवकरच ते प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे आपणही गोरगरिबांच्या दारात जावून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. एकटे जरी असलो तरी सत्याच्या बाजूने उभे राहणे आपले कर्तव्य आहे याची जाणीव जयंत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करून दिली.
यावेळी शिवसेना आणि भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला
यावेळी माजी मंत्री रमेश बंग, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहराध्यक्ष राजीव कक्कड, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात आपल्याला एकही जागा लढवता आली नाही. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले मात्र आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता राजुरा मध्ये पक्षासाठी काम करत आहे.त्या सर्व कार्यकर्त्यांचे,पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कौतुक केले. चंद्रपूर जिल्हयातील राजुरा विधानसभा मतदारसंघात आज आढावा बैठक पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. तेव्हा आपण पक्ष वाढविण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे. अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असतात अशा लोकांना पक्षात येण्यास प्रोत्साहित करा, पक्षाची बुथ कमिटी मजबूत करा, संपर्क वाढवा असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष करा… संघर्षाशिवाय गत्यंतर नाही… या संघर्षातून तुम्ही मार्ग काढला तर उद्याचा सुर्य राष्ट्रवादीचा असेल असे आवाहनही जयंत पाटील यांनी युवकांना केले.
यावेळी माजी मंत्री रमेश बंग, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.