ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या शुभारंभ; रोजगाराच्या संधीसाठी उपक्रम

बल्लारपूर तालुकातील बामणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ओंकार ग्रामसंघ अमित नगरच्यावतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात करण्यात आली.

    बल्लारपूर (Ballarpur).  तालुकातील बामणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ओंकार ग्रामसंघ अमित नगरच्यावतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य Adv. हरीश गेडाम, बामणी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष ताजने, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण शेंडे उपस्थित होते.

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा उद्देश हा आहे की तळागाळातील गरिबांसाठी मजबूत अशा संस्थांची बांधणी करून त्याद्वारे लाभदायक स्वयंरोजगार व कुशल वेतनी रोजगाराची संधी मिळविणे गरीब कुटुंबांना शक्य व्हावे व त्याद्वारे दारिद्र्य कमी करणे आहे. बचतगटांच्या माध्यमातून उमेद मार्फत ही यंत्रणा राबविली जाईल कार्यक्रमात ओंकार ग्राम संघाच्या पल्लवी मेश्राम, नंदा पेंदोर, स्नेहल साळवे, शकुंतला मोटघरे, अश्विनी शिंदे यांची उपस्थिती होती. संचालन शकुंतला मोटघरे यांनी केले.