leopard died in warora

वरोरा. नागपूर चंद्रपूर महामार्गावरील वरोरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनी जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारला रात्री १०.४५ ला घडली.

वरोच्याच्या जवळील आनंदवनला लागून असलेल्या  झुडपी जंगलात  या बिबट्याचा अधिवास होता. मागील चार महिन्यांपासून  या मादी बिबट्याचे वास्तव्य आपल्या दोन पिलांसह त्याठिकाणी असल्याचे अनेकांनी बघितले. आज रात्री हा बिबट नागपूर चंद्रपूर महामार्ग पार करीत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मारला गेला .

सदर अपघाताची नोंद वरोरा वनविभाग क्षेत्रात घेतली असून  शवविच्छेदनासाठी बिबट्याला चंद्रपूर येथे नेण्यात आले. या अपघाताची माहिती अपास एनजीओ विशाल मोरे यांनी वरोरा येथील वनरक्षक डोर्लीकर यांना सर्वप्रथम देण्यात आली. यानंतर वनविभागाने तात्काळ दखल घेत वनविभाग वरोरा येथे आणण्यात आले होते.