shegaon police

वरोरा. तालुक्यातील शेगाव बु पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुख्य मार्गावर शेगाव पोलिसांची विशेष पाळत असून गेल्या काही दिवसा पासून अवैद्य दारू तस्करी रोखण्यासाठी रात्री गस्त केली जात आहे . यात  गस्त सुरु असता दोन दिवसात दोन चारचकी वाहने दारू तस्करी करित असतांना शेगाव पोलिसांनी पकडले . चारगांव ते वडधा या मार्गावर  फोर्ड कम्पनिची चारचकि  mh 40 – db 2494  या वाहनातून १३ पेटया देशी दारू, ३ मोबाइल,  १ लाख २६ हजार रूपयाचा माल जप्त करुण चार चाकी ची किम्मत  ४ लाख रु. असा एकूण ५ लाख २६ हजार रूपयाचा मुद्देमाल माल जप्त केला.  यात आरोपी अक्षय मधुकर लभाने  रा वाघेड़ा  समुद्रपुर,   रविन्द्र धनराज चव्हाण रा तड़गाव समुद्रपुर,  राजकुमार खोब्रागडे वडगांव वरोरा, नथु तेलंग रा पिंपळगाव  समुद्रपुर अशा चारही आरोपींना  ताब्यात घेऊन मुद्देमलस अटक करण्यात आली.
तर  दुसऱ्याच दिवशी खेमजाई  पोहा या मार्गावर चार चाकी वाहनाची झड़ती घेतली असता या  वहनातून १० पेटी देशी दारू संतरा  १ लाख रूपयाची  व चार चाकी वाहन  mh 34 , bf 5881 किंमत  ३ लाख रुपये असा एकूण  ४ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . शेगाव पोलिसांनी   २ दिवसात  एकूण दहा लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.  सदर  करवाई येथील ठानेदार  सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय  प्रवीण जाधव, महादेव सरोदे, किशोर पिरके, पो शी  विठल वैद्य , देवा डुकरे, राकेश तुरणकर, प्रवीण जूनघरे, राजू टेम्भूर्ने  इत्यदिनी केली.