जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महाकाली स्पोर्ट्स सर्कल संघ विजयी

येथील जय भारत व्यायाम अखाडा मैदानावर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. या स्पर्धेत 65 किलो वजन गटात विजेता संघ मराठा योद्धा स्पोर्ट्स बोर्ड, कोंडा ठरला. द्वितीय क्रमांक त्रिशूल क्रीडा मंडळाने पटकाविला. 55 किलो वजन गटातील महाकाली स्पोर्ट्स सर्कल, चंद्रपूरचा संघ विजयी झाला.

    बल्लारपूर (Ballarpur).  येथील जय भारत व्यायाम अखाडा मैदानावर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. या स्पर्धेत 65 किलो वजन गटात विजेता संघ मराठा योद्धा स्पोर्ट्स बोर्ड, कोंडा ठरला. द्वितीय क्रमांक त्रिशूल क्रीडा मंडळाने पटकाविला. 55 किलो वजन गटातील महाकाली स्पोर्ट्स सर्कल, चंद्रपूरचा संघ विजयी झाला.

    द्वितीय क्रमांक साईबाबा बहुउद्देशीय क्रीडा मंडळाने पटकाविला महिला गटातील विठ्ठल व्यायिका शाळा संघ चंद्रपूर विजय झाला. तर श्रीराम बाळ आखाडा, बल्लारपूर संघाला द्वितीय क्रमाक देण्यात आला. सर्व विजेत्या संघाला ट्रॉफी आणि बक्षिसे प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक लक्ष्मण पोहणे व संचालन निलेश मावे यांनी केले. कबड्डी स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, वरोरा, भद्रावती, कोंडा, गौरी, नगरी, मोहाबाळा येथील विविध संघाने सहभाग दर्शविला.

    यशस्वीतेसाठी सुरेश घुबडे, दिलीप वाघाडे, श्रीनिवास गुमला, अखिल पोहाणे, लक्ष्मण पोहणे, किशन घुबडे, शंकर टोकल, धर्मपाल भैय्या, सलीम बेग, निखिल पोहणे, अरुण हजारे, पुप्पल पोहाणे, प्रशांत बांदीवार, तेजपाल मानकर, राजू घुबडे आदींनी सहकार्य केले.