तहसील कार्यालयात दक्षता समितीची सभा; विनातक्रार नागरिकांना धान्य पोहोचविण्याच्या सूचना

तालुकास्तरीय सर्व तालुकास्तरीय व नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था, दक्षता समितीची सभा राजुरा तहसील कार्यालयात 15 मार्च रोजी पार पडली. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष, राजुराचे तहसीलदार हरीश गाठे व सर्व संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तालुकास्तरीय व नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण प्रणाली कार्यक्षमता समिती सदस्य व रास्तभाव दुकानदार यांची सभा घेण्यात आली.

    राजुरा (Rajura). ता लुकास्तरीय सर्व तालुकास्तरीय व नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था, दक्षता समितीची सभा राजुरा तहसील कार्यालयात 15 मार्च रोजी पार पडली.

    याप्रसंगी समितीचे अध्यक्ष, राजुराचे तहसीलदार हरीश गाठे व सर्व संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तालुकास्तरीय व नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण प्रणाली कार्यक्षमता समिती सदस्य व रास्तभाव दुकानदार यांची सभा घेण्यात आली. यावेळी नागरिकांना वेळेवर व विना तक्रार धान्याचा पुरवठा करण्यासंबंधी अन्न पुरवठा विभाग व स्वस्त धान्य दुकानदारांना सूचना देण्यात आल्या.

    दुकानदार व समिती सदस्य यांनी मौखिक समस्या समितीसमोर मांडल्या. तालुक्यात एकूण 108 रास्तभाव दुकाने कार्यान्वित असून शिधापत्रिकांमध्ये पूर्ण शंभर टक्के आधारकार्ड संगणकीकरण झाले असल्याची माहिती देण्यात आली.
    यावेळी पंस सभापती मुमताज अब्दुल जावेद, संवर्ग विकास अधिकारी ओमप्रसाद रामावत, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, निरीक्षक अधिकारी सविता गंभीरे, पुरवठा निरीक्षक विकास राजपूत, नरेंद्र खांडेकर, गोडाऊन व्यवस्थापक मिलिद कांबळे, धनराज गेडाम व इतर सहकारी उपस्थित होते.