लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत नागपूर संघाची बाजी; ग्रीन गोंडवाना बहु. सेवा मंडळाचे आयोजन

बल्लारपूर येथील ग्रीन गोंडवाना बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या वतीने शहरात राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. यास्पर्धेतील अंतिम सामना स्पेअर एकाडमी नागपूर व जैन फॅब्रिकेशन जळगाव यांच्यात खेळविण्यात आला.

    बल्लारपूर (Ballarpur).  ग्रीन गोंडवाना बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या वतीने शहरात राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. यास्पर्धेतील अंतिम सामना स्पेअर एकाडमी नागपूर व जैन फॅब्रिकेशन जळगाव यांच्यात खेळविण्यात आला. या स्पर्धेत स्पेअर एकादमी नागपूर संघाने अखेर बाजी मारत विजय प्राप्त केला.

    148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत नागपूर संघाने ही स्पर्धा जिंकली. विजेत्या आणि उपविजेत्या संघाला पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. बल्लारपूर वकोलि मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात जळगाव संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 148 धावांचे लक्ष्य ठेवले. विजयी संघाला एक लाख 11 हजार 111 रुपये रोख, टायगर ट्रॉफी व उपविजेत्या संघाला 55 हजार 555 रुपये आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. पुरस्कार वितरण समारंभात मुन्ना सिद्दीकी, संतोष माहेश्वरी, राजू झोडे प्रमुख्याने उपस्थित होते.

    या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता ग्रीन गोंडवाना बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील मोतीलाल, चेतन गेडाम, शमीम सिद्दीकी, साजित सिद्दीकी, अस्लम शेख, अभिनव, तिवारी, मन्सूर सिद्दीकी, नसीर बक्ष, सागर रेड्डी, मुकीम सिद्दीकी व कार्यकर्ते किरण नमस्वामी, वसीमखान, फैम खान, राजकरण केशकर, राहुल यादव, रूपेश रामटेके, राहुल घुगरूडकर, सीनु एंगलवार, ताहिर, रोहित, समीर आदींनी सहकार्य केले.