आता वाघांचेही होणार कुटुंबनियोजन, का ते जाणून घ्या…

  • चंद्रपूर जिल्ह्यात आता पट्टेरी वाघांची संख्या वाढतच आहे. याच जिल्ह्यात जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि संपन्न असं घनदाट जंगल आहे. या जंगलात वाघांची संख्या आता ३०० पेक्षा जास्त आहे. वाघांना जंगल अपुरे पडत असल्याने ते आता मनुष्य वस्तीकडे पलायन करत आहेत. वाघांचे माणसांवरील हल्ले करण्याची प्रकरणंही वाढली आहेत.

चंद्रपूर – भारताची लोकसंख्येत झपाट्याने वाढू लागल्याने कुटुंब नियोजन ही संकल्पना तयार करण्यात आली. तसेच राज्यात वाघांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्या बाबतही राबवण्याचा विचार प्रशासन करत आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे तेथे मानवी जीवनाला धोका निर्माण होणार असल्याची चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे वाघांची नसबंदी करण्याचा विचार वनविभागाने केला आहे. या विचारा बाबत राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात आता पट्टेरी वाघांची संख्या वाढतच आहे. याच जिल्ह्यात जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि संपन्न असं घनदाट जंगल आहे. या जंगलात वाघांची संख्या आता ३०० पेक्षा जास्त आहे. वाघांना जंगल अपुरे पडत असल्याने ते आता मनुष्य वस्तीकडे पलायन करत आहेत. वाघांचे माणसांवरील हल्ले करण्याची प्रकरणंही वाढली आहेत. वाघांची वाढती संख्येवर उपाय शोधला जात आहे. आज राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजले जात आहे. 

वाघांची वाढती संख्या कमी करण्यासाठी वनविभागाने नसबंदी करण्याचा विचार करत आहेत. यामुळे वाघांची संख्या आटोक्यात येईल तसेच वाघांच्या हल्ल्याचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार याकडे स्थानिक जनतेचे लक्ष लागले आहे.