दारूबंदी हटवल्यानंतर आता दारूसाठी प्रतीक्षा ; लवकरच सुरू होणार दारूची दुकाने

दारूबंदी झाली तेव्हा ५३६ दारूची दुकाने तसेच बार होते. यातील ४६ परवाने इतर जिल्हात स्थानांतरीत झाले. तर ४९० जिल्हात होते. त्यापैकी ३१४ बारचे स्थलांतरण झाले नाही. तर देशी दारूच्या किरकोळ १०६ दुकानांपैकी ८ परवाने तेव्हाच स्थलांतरीत झाले. विदेशी दारूच्या किरकोळ विक्रीच्या २४ दुकानांपैकी १९ दुकानांचे स्थानांतर झाले आहे.

    चंद्रपूर : तळीरामांसाठी आनंदाची बातमी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यानंतर आता दारू विक्रेते दुकाने सुरु करण्यासाठी तर मद्यपी दारू हातात मिळण्याची वाट पाहत असून लवकरच दारू दुकाने सुरु होणार आहे. परवाना नुतनीकरणाची प्रक्रीया सुरु झाली आहे. दरम्यान, परिपूर्ण कागदपत्र असलेल्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जागेचा प्रथम मौका चौकशी करणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अधिक्षक दुकाने सुरु करण्याची परवानगी देणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच जिल्ह्यातील दारू दुकाने सुरु होणार आहे.

    जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हा ५३६ दारूची दुकाने तसेच बार होते. यातील ४६ परवाने इतर जिल्हात स्थानांतरीत झाले. तर ४९० जिल्हात होते. त्यापैकी ३१४ बारचे स्थलांतरण झाले नाही. तर देशी दारूच्या किरकोळ १०६ दुकानांपैकी ८ परवाने तेव्हाच स्थलांतरीत झाले. विदेशी दारूच्या किरकोळ विक्रीच्या २४ दुकानांपैकी १९ दुकानांचे स्थानांतर झाले आहे. या दुकानांचा परवाना नुतनीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, अनेकांनी शासकीय नियमानुसार चलन सुद्धा घेतले असून पुढील प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.