चंद्रपूरमध्ये कोरोना बाधितांची संख्या १०२४२ वर

  • मृतांचा आकडा १५०च्या वर

चंद्रपूर. (Chandrapur)  जिल्ह्यात वेगाने वाढणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. आज जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २३३ ने वाढली असून ती १०२४२ झाली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा १५२वर पोहोचला आहे.

चंद्रपूरच्या रूग्णालयात सध्यात ४०४३ कोरोना बाधित उपचार घेत आहेत. तर ६०४७ कोरोना रुण पूर्णपणे बरे होऊन स्वगृही परतले आहेत. शहरातील सहकार नगर निवासी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याला २७ सपटेंबर रोजी रुग्णालतयात दाखल करण्यात आले होते. त्याला ब्लडशुगर होते. दुसरा व्यक्ती मंजुषा ले-आउट भद्रावती निवासी ६१ वर्षीय पुरुष आहे. त्याला २५ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला ब्लड शुगर आणि उच्च रक्तदाबाची समस्या होती. तिसरा मृतक राजुरा निवासी ७२ वर्षीय पुरुष आहे. त्याला २८ सप्टेंबर रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो निमोनियाचाही रुग्ण होता. ३ मृतकांसोबत जिल्ह्यात कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या १५२ झाली आहे. यामध्ये चंद्रपुरातील १४३, तेलंगानातील १, बुलढाणातील १, गडचिरोलीतील १, यवतमाळमधील ३ आणि भंडारा जिल्ह्यातील एका बाधिताचा समावेश आहे.