भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

राज्यातील मंदिरं सुरु झाल्यानंतर प्रमुख मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही श्रींची इच्छा म्हणत मंदिरं उघडण्यास परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारच्या डोक्यातला अंधार दूर झाला आणि मंदिर सुरु करण्याचा प्रकाश त्यांच्या डोक्यात पडला, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. सरकारने राजकारण न करता तर्काच्या आधारावर निर्णय घ्यावे, अशी अपेक्षाही मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

  • सुधीर मुनगंटीवार यांचा राज्य सरकारला टोला

चंद्रपूर (Chandrapur): राज्यातील मंदिरं सुरु झाल्यानंतर प्रमुख मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही श्रींची इच्छा म्हणत मंदिरं उघडण्यास परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारच्या डोक्यातला अंधार दूर झाला आणि मंदिर सुरु करण्याचा प्रकाश त्यांच्या डोक्यात पडला, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. सरकारने राजकारण न करता तर्काच्या आधारावर निर्णय घ्यावे, अशी अपेक्षाही मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

मग मंदिरं का सुरु केली?
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. लोकांच्या आणि आमच्या दबावामुळे मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला, असा दावा दरेकर यांनी केला आहे. सरकार कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं सांगतं. मग मंदिरं का सुरु केली? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. हे सरकार गोंधळलेलं असल्याची टीका दरेकरांनी केली आहे.

९ महिन्यांनंतर देवदर्शन, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
— राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आजच्या मंगल दिनी प्रत्येक मंदिरात भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आज भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

साई मंदिर खुलं झाल्याने भाविकांनी पहाटपासुनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. यामुळे दर्शन रांगेत भाविकांनी गर्दी दिसून येत आहे. आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांना मंदिरात जाऊन साईंबाबांचं दर्शन मिळत असल्याने भाविकांमध्ये‌ समाधानाचं वातावरण आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर तब्बल 8 महिन्यानंतर खुलं झाल्यामुळे राज्यभरातून अनेक भाविक भल्या पहाटे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणाहून भाविक सहकुटुंब दाखल झाले आहेत. आई भवानीच्या दर्शनाची आतुरता होती ती पूर्ण झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे. बुलढाण्यात शेगांवचं गजानन महाराज मंदिर आज उघडणार नाही आहे. संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी उद्या १७ नोव्हेंबरला मंगळवारपासून उघडणार असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. तर दर्शनासाठी ई-पास घ्यावा लागणार असल्याची माहिती आहे.