चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू

चंद्रपुर - चंद्रपुर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढतच आहेत. आतापर्यंत यावर्षीचा हा १७ वा प्रकार घडला आहे. चंद्रपुरात वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला करुन त्याला ठार केले आहे. जिल्ह्यातील

 चंद्रपुर – चंद्रपुर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढतच आहेत. आतापर्यंत यावर्षीचा हा १७ वा प्रकार घडला आहे. चंद्रपुरात वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला करुन त्याला ठार केले आहे. जिल्ह्यातील तोहगाव वनविभागाच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. हा परिसर चंद्रपुर पासून अगदी ६० किमी च्या अंतरावर आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव दिनकर ठेंगरे आहे. 

या हल्ल्याची वनविभागाला माहिती कळताच तातडीने घटनास्थळी पोहचले. आणि पाहणी केली. वनविभाग अधिकारी म्हणाले की, या हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यात येईल. त्यासाठी वन विभागात १६ कॅमेरे लावण्यात येतील. हा वाघ इतर नागरिकांसाठीदेखील धोकादायक ठरेल. त्यामुळे त्याला लवकरात लवकर पकडले जाईल, असे अश्वासन वनविभाग अधिकाऱ्यांनी दिले आहे.