पुयारदंड गावातील एका विहिरीत तरंगत असलेला रोहित जांभुळे नामक युवकाचा मृतदेह
पुयारदंड गावातील एका विहिरीत तरंगत असलेला रोहित जांभुळे नामक युवकाचा मृतदेह

  • पार्सलद्वारे पाठविलेल्या पॅकिंग डब्यात मोबाईलऐवजी न वापरलेल्या वस्तू

शंकरपूर (Shankarpur):  ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्याने हताश झालेल्या युवकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी अप्पर तहसील अंतर्गत पुयारदंड गावात गुरुवारी रात्री ही घटना घडली. रोहित राजेंद्र जांभुळे (वय १८) असे मृतकाचे नाव आहे. आज सकाळी ११ वाजता या युवकाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. फसव्या मोबाइल कंपनीवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली सध्या अनेक कंपन्यांनी आपला बाजार उघडला आहे. मोठ्या जाहिरातींद्वारे लोक दम देणारे लोभ देऊन तरुणांना आमिष दाखवतात. भिसी अप्पर तहसील अंतर्गत पुयारदंड येथे राहणारा रोहितने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन शॉपिंगद्वारे १५ हजार रुपयांचा मोबाईल फोन बुक केला होता. मोबाईलचे १० हजार रुपये कंपनीला ऑनलाईन भरले जायचे आणि उर्वरित ५ हजार मोबाइल पार्सल पोचल्यानंतर कार्यालयात पोचवायचे होते. यासाठी त्या युवकाला पोस्ट ऑफिसचा फोन आला की, आपले पार्सल आले आहे. त्याने त्याच्या आईकडे पैसे मागितले; परंतु आईकडे इतके पैसे नसल्याने रोहितने इतरांकडून पैसे जमा केले आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पार्सल घेतला; पण उघडल्यावर मोबाईल ऐवजी २ पर्स, १ बेल्ट, रिकामे खोके अशा निरुपयोगी वस्तू निघाल्या.

मोबाइल कंपनीला फसवणूकीची माहिती होताच त्याने कंपनीच्या नंबरवर कॉल केला; पण कंपनी प्रतिनिधीने फोनच उचलला नाही. रोहित हा घराची आर्थिक परिस्थिती आणि १५ हजार रुपयांच्या फसवणूकीमुळे खूप उदास झाला होता. तो गुरुवारी दुपारी तीन वाजता घराबाहेर पडला; पण उशिरापर्यंत घरीच परतला नाही. यामुळे पालकांनी, नातेवाईकांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. परंतु तो सापडला नाही. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता गावातील काही शेतकरी व महिला शेतात जात असताना रोहितची कार व कपडे विहिरीजवळ दिसले. विहिरीत त्याचा शोध घेत असता त्याचा मृतदेह सापडला. कमरला बांधलेल्या दगडाच्या बोराने रोहितने उडी मारली होती. रोहितच्या आत्महत्येने पुयारदंड आणि आसपासच्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी दोषी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी गाम्रस्थांनी केली आहे.