सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन; अरुण नरुले यांनी केली उत्तम लागवड

नागभीड शहरात सुलेझरी येथील रहिवाशी अरुण नरुले यांनी सेंद्रिय पद्धतीने उन्हाळी भाजीपाला लागवड केली असुन ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा एक आदर्श इत्तर शेतकरी बांधवांपुढे निर्माण केला आहेत.

    नागभीड (Nagbhid).  नागभीड शहरात सुलेझरी येथील रहिवाशी अरुण नरुले यांनी सेंद्रिय पद्धतीने उन्हाळी भाजीपाला लागवड केली असुन ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा एक आदर्श इत्तर शेतकरी बांधवांपुढे निर्माण केला आहेत. त्यांनी आपल्या शेतात एसपीएनएफ पद्धतीने भेंडी, चवडी शेंगा, गवार, दोडका, कोहळा, वांगे, लवकी टमाटर, पालक, सांभार, ढेमसे इत्यादींची लागवड केली असुन शेतात व आपल्या सुलेझरी येथे भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.

    महत्त्वाचे म्हणजे सर्व भाजीपाला नैसर्गिक, सेंद्रिय आहे. अरुण नरुले रासायनिक खत व रासायनिक औषधे अजिबात वापरत नाही. ग्राहकांना ते जाहीरपणे आवाहन करून शेतात एकदा भेट देऊन व खात्री करण्यास सांगतात. याशिवाय स्वतःला निरोगी जीवन जगायचे असलेल्यांनी विष मुक्त भाजीपाला आहारात घेण्याची जागरूकताही ते नित्यनेमाने करीत आहेत. विशेषता अरुण नरुले हे शहरी असले तरी त्यांना नैसर्गिक सुधारित तंत्रज्ञान आधारित शेती करण्याची आवड त्यांना आहे. सातत्याने कृषी विभागाशी संपर्कात राहून नवीन माहिती व कृषी संबंधित योजनांचा लाभ नरूले घेत असतात.

    त्यांनी शेण खताचा वापर, जैविक औषधे स्वतः निर्माण करून फवारणी करीत असतात. त्यांना नैसर्गिक , जैविक शेतीचा दांडगा अनुभव झाला आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी शेतात व घराचा संपर्कासाठी अरुण नरुले यांनी व्यवस्थासुद्धा उपलब्ध केली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ताजा नैसर्गिक भाजीपाला थेट शेतातून ते ग्राहकांना विकत आहेत.