वाघांच्या हल्यात इसम गंभीर जखमी

सिंदेवाही. सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मरेगाव बिटातील कक्ष क्रमांक १४१२ खैरी (चक) गटातील २९० मधील बोंडकू सुरपाम यांच्या शेताजवळ गुरेढोरे चारत असताना दब्बा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने विक्रम जानबा आदे वय ४७,गुंजेवाही (बेघर) याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्याच्या डोक्याला, डाव्या हाताला व डाव्या पायाला जखम झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे उपक्षेत्र अधिकारी कुळमेथे,उपक्षेत्र अधिकारी रासेकर,वनरक्षक गेडाम ,वनरक्षक राठोड यांनी वरिष्ठ अधिकारी यांना दूरध्वनी वरुन घडलेली माहिती देऊन संबंधित जखमी इसमाला प्रथमोपचार करण्यासाठी गुंजेवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करून त्याला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले. पुढील तपास वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड हे करीत आहेत.