वनपरिक्षेत्रात कर्मचाऱ्यांनी पाळला निषेध दिवस; दीपाली चौहान यांना न्याय देण्याची मागणी

बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दीपाली चव्हाण यांच्या समर्थनार्थ कारवा नर्सरी येथे काळया फिती लावून निषेध दिवस पाळण्यात आला. दीपाली चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी होत्या. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.

    बल्लारपूर (Ballarpur).  बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दीपाली चव्हाण यांच्या समर्थनार्थ कारवा नर्सरी येथे काळया फिती लावून निषेध दिवस पाळण्यात आला. दीपाली चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी होत्या. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.

    निलंबित शिवकुमार यास जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करून निलंबित करण्यात आले. दिपालीच्या आत्महत्येस सदर अधिकारी जबाबदार होते. त्याचप्रमाणे वनसंरक्षक रेड्डी यास दोषी धरून त्यासही निलंबित करण्यात आले. दिपाली सारख्या उमद्या अधिकाऱ्याच्या आत्महत्येने वनविभागातील वातावरण ढवळून निघाले. वन विभागातील वरिष्ठ अधिकारी खालच्या अधिकाऱ्यांना मनाप्रमाणे काम न केल्यास त्यास त्रस्त देतात, ही गंभीर बाब समोर आल्याने त्यांच्यात दहशत निर्माण झाली.

    राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी संघटना या घटनेच्या निषेधार्थ न्यायासाठी पुढे सरसावली आहे. त्या अनुषंगाने बल्लारपूर वनक्षेत्रात कारवा निर्सरी येथे वनाधिकारी संतोष थिपे यांच्यासह क्षेत्र सहायक प्रवीण विरुटकर, प्रवीण बिबटे, नरेश भोवरे तसेच वनरक्षक एकत्र येऊन सदर प्रकाराचा काळया फिती लावून निषेध दिवस पाळण्यात आला. यावेळी दिपालीला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.