‘दारू विकाल तर घरात घुसून मारू’, अवैध दारूविक्रेत्याच्या घरावर हल्लाबोल ; VIDEO व्हायरल…

चंद्रपूर जिल्ह्यात या ना त्या मार्गाने दारू तस्करी केली जाते. आरोपी पकडले जातात. कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त होतो . तरीही दारूविक्रीचे प्रमाण वाढतच जाते. आता चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागात विकली जाणारी अवैध दारू परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरू लागली आहे.

    चंद्रपूर :  चंद्रपूर शहरात अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. विशेष म्हणजे अवैध दारूविक्रेत्यांची दादागिरी आता वाढली आहे. ते नागरिकांना आता जीवे मारण्याची धमकी देखीत देऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, शहराती इंदिरानगरच्या नागरिकांचा संयम आज सुटला. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन दारु विक्रेत्याच्या घरात घुसून हल्लाबोल केला. तसेच दारू विकाल तर घरात घुसून मारु, अशी ताकीदही नागरिकांनी दिली.

    चंद्रपूर जिल्ह्यात या ना त्या मार्गाने दारू तस्करी केली जाते. आरोपी पकडले जातात. कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त होतो . तरीही दारूविक्रीचे प्रमाण वाढतच जाते. आता चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागात विकली जाणारी अवैध दारू परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरू लागली आहे.

    इंदिरानगर भागात प्रचंड दारू विकली जाते, असा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार देखील केली आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. पण दारूविक्रेते शिरजोर झाले आहेत. नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा देतात.