t1 tiger

मागील दिड वर्षात १० निष्पाप लोकांचा बळी घेणा-या आर टी १ वाघाने पुन्हा एकदा वनविभागाला हुलकावणी देत पिज-यातून निसटला आहे. वाघ पिंज-यात अडकल्यावर देखील बाहेर निघाल्याने वनविभागाचे कर्मचा-यांना बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली.

चंद्रपूर- मागील दिड वर्षात १० निष्पाप लोकांचा बळी घेणा-या आर टी १ वाघाने पुन्हा एकदा वनविभागाला हुलकावणी देत पिज-यातून निसटला आहे. वाघ पिंज-यात अडकल्यावर देखील बाहेर निघाल्याने वनविभागाचे कर्मचा-यांना बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली.

आरटी १ वाघाने राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात धुमाकूळे घातला असून या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने एका नाल्याजवळ पिंजरा लावला आहे. दरम्यान शनिवारी वाघ याठिकाणी पोहोचला. यावेळी वाघ जेरबंद होणार अशी सर्व वनकर्मचा-यांनी खात्री झाली. वाघ तावडीत येणार असे चित्र निर्माण झाले असतानाच वाघ पिंज-यातून बाहेर निघाला.

त्यामुळे सर्वांचीच निराशा झाली. मागील सात महिन्यांत अनेकवेळा या वाघाने वनविभागाला अशीच हुलकावणी दिली आहे. पिंज-यातील शिकार पाहुण शुक्रवारी रात्री १०.३० वाजता त्याने पिंज-यात प्रवेश केला. परंतु, पिंज-यात आपण कैद झालो असल्याची शंका येताच वाघाने पूर्ण ताकदीने पिंज-याचे दार ढकलून बाहेर पळ काढला.