फक्त तीन मिनीटे उशीर झाला अन्…. हातात आलेली सत्ता गमावून बसला

वेळ कुणासाठी थांबत नाही... याचा चांगलाच प्रत्यय चंद्रपूरातील एका ग्रामपंचायतीत विजय मिळवणाऱ्या एका पॅनलला आहे. फक्त तिन मिनीटे उशीर झाला म्हणून हे विजयी पॅनेल हातत आलेली सत्ता गमावून बसले आहे.  गोंडपिपरी तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीत हा रंगतदार प्रकार पहायला मिळाला.

    चंद्रपूर : वेळ कुणासाठी थांबत नाही… याचा चांगलाच प्रत्यय चंद्रपूरातील एका ग्रामपंचायतीत विजय मिळवणाऱ्या एका पॅनलला आहे. फक्त तिन मिनीटे उशीर झाला म्हणून हे विजयी पॅनेल हातत आलेली सत्ता गमावून बसले आहे.  गोंडपिपरी तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीत हा रंगतदार प्रकार पहायला मिळाला.

    तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीची निवडणुक पार पडली. प्रशासनाने अनु.जाती करिता सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. गावातील दोघे या गटातून निवडून आल्याने रस्सीखेच सुरू झाली. यापैकी एका गटाने चार उमेदवार गोळा केले. कुणाला दुसऱ्या गटात जाण्याची संधी मिळू नये यासाठी संपुर्ण चमुला घेउन पिकनीकला गेला.

    निवडणुक प्रक्रियेवेळी हा गट ग्रामपंचायतीत हजर झाला. पण त्यांना तिथे पोहचण्यास ३ मिनीट उशीर झाला. त्यामुळे त्यांना सरपंच पदाकरिता अर्ज दाखल करता आला नाही.

    दुसऱ्या गटातील तरूण उमरे याने सरंपचपदासाठी अर्ज दाखल केला होता .अर्ज भरण्याचा तारीख गेल्यामुळे दुसऱ्या गटाला अर्ज भरण्याची संधीच मिळाली नाही. अनं तिन सदस्य असूनही पहिल्या दिवशी अर्ज दाखल केलेला तरूण उमरे याची सरपंचपदी निवड झाली.