दुकानदारांची ऑनलाईनऐवजी कॅशला पसंती; नागरिकांसाठी डोकेदुखी वाढली

देशभर कोरोनाच्या संकटाने नागरिकत्रस्त झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूच्या खरेदी विक्रीचे व्यवहार वगळता इतर सर्व ठप्पआहे. जीवघेण्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक व्यवहार कॅश ऐवजी ऑनलाईन पद्धतीनेहोणे गरजेचे असताना काही दुकानदारांचा अट्टाहास कॅश घेण्याकडे अधिक आहे.

    चंद्रपूर (Chandrapur).  देशभर कोरोनाच्या संकटाने नागरिक त्रस्त झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूच्या खरेदी विक्रीचे व्यवहार वगळता इतर सर्व ठप्पआहे. जीवघेण्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक व्यवहार कॅश ऐवजी ऑनलाईन पद्धतीनेहोणे गरजेचे असताना काही दुकानदारांचा अट्टाहास कॅश घेण्याकडे अधिक आहे. त्यामुळे नागरिकांच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे. एकीकडे पुरेशी कॅश जवळपास नसताना दुकानदार ऑनलाईन व्यवहार करण्यास का टाळाटाळ करीत आहेत, असा प्रश्न ते दुकानदार, व्यापारी यांना विचारत आहेत.

    शहरात सध्या केवळ जीवनावश्यक वस्तू तसेच किराणा व इतर सामानाची दुकाने सुरू आहेत. त्या वस्तू खरेदी करताना अनेकदा नागरिकांकडे पुरेशी कॅश नसल्याने ते पेटीएम , गुगल पे, क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करीत आहेत. मात्र यात काही दुकानदार त्यांच्याकडे कार्ड स्वॅप करण्यासाठी पोस मशीन असताना देखीलते बंद असल्याचे कारण देत आहेत. केवळ कॅश स्वीकारली जाईल असे बजावत आहे. यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पैसे हाताळण्यापेक्षा ग्राहक आणि दुकानदार यांनी ऑनलाईन व्यवहारालाप्राधान्य द्यावे. निदान सध्याच्या काळात दुकानदार, व्यापारी यांनी ग्राहकांचे हितलक्षात घेण्याची गरज आहे.

    ग्राहकांनी देखील जास्तीत जास्त ऑनलाईन खरेदी व्यवहार करावा.सगळ्याच नागरिकांकडे पुरेशा प्रमाणात कॅश असतेच असे नाही. मात्र त्यांच्या पेटीएम किंवागुगल पे यात पैसे असल्याने ते त्या माध्यमातून व्यवहार करू शकतात. पण यात दुकानदाराकडून सहकार्याची अपेक्षा आहे. त्यांच्या अडेलतट्टू भूमिकेतून काही साध्य होणार नाही. ग्राहकांनीआपला पिन क्रमांक याविषयी काळजी घ्यावी. अकाउंट व्यवस्थित लॉग आऊट करावे. तसेच पिनऐवजी ओटीपीचा वापर करावा. आपली फसवणूक होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे प्रशासनाकडूनसूचविण्यात आले आहे.