एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू; चंद्रपुरमधील घटना

दुर्गापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रमेश लष्करे(44) यांच्यासह कुटुंबातील 6 सदस्यांचा जनरेटरच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर आहे. मृतांमध्ये एका नवदाम्पत्याचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. रमेश यांची पत्नी दासू (40) यांची प्रकृती नाजूक असून, त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच लग्न झालेले अजय आणि माधुरी या नवदाम्पत्याचाही मृतांमध्ये समावेश आहे.

    चंद्रपूर : दुर्गापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रमेश लष्करे(44) यांच्यासह कुटुंबातील 6 सदस्यांचा जनरेटरच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर आहे. मृतांमध्ये एका नवदाम्पत्याचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. रमेश यांची पत्नी दासू (40) यांची प्रकृती नाजूक असून, त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच लग्न झालेले अजय आणि माधुरी या नवदाम्पत्याचाही मृतांमध्ये समावेश आहे.

    सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वीज गेल्याने रमेश लष्करे यांनी 11.30 वाजता घरातील जनरेटर सुरू केले व संपूर्ण कुटुंब झोपी गेले. जनरेटरचा धूर बाहेर न निघाल्याने धुरामुळे गुदमरून लष्करे कुटुंबातील रमेश लष्करे (44 वर्ष), अजय लष्करे (20 वर्ष), लखन लष्करे (9 वर्ष), माधुरी लष्करे (18 वर्ष), कृष्णा लष्करे (08 वर्ष), पूजा लष्करे( 14 वर्ष) अशा सहा सदस्यांचा मृत्यू झाला. मुलगा अजय व माधुरीच्या लग्नामुळे घरात आनंदी वातावरण होते. परंतु काळाने झडप घातल्याने शोककळा पसरली आहे.

    रमेश यांची पत्नी दासू लष्करे (40 वर्ष) या गंभीर असून, त्यांना झाडे हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती केले आहे. मंगळवारी 13 जुलैला सकाळी 6.00 वाजता कुणीही घरातून बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून बघितले असता सदर घटना लक्षात आली. सहाही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे ठेवण्यात आलेले आहे. पुढील तपास चंद्रपूर पोलिस करीत आहे.