ताडोबा पर्यटनाला लवकरच होणार सुरुवात ; व्यावसायिकांना मोठा दिलासा

ताडोबा प्रकल्प बंद असल्याने त्यावरील आधारित व्यवसाय आणि रोजगार देशोधडीस लागला आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार,  ताडोबा व्याघ्र प्रकल्प येत्या एक ऑक्टोबरपासून (October) सुरू होणार आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) प्रादुर्भावामुळे गेल्या सहा महिन्यांपासून पर्यटन (Tourism ) क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक लोकांसमोर रोजगाराचा (Employment) प्रश्न उभा राहीला आहे. यामध्ये जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचाही (Tadoba tourism will start soon) समावेश आहे. ताडोबा प्रकल्प बंद असल्याने त्यावरील आधारित व्यवसाय आणि रोजगार देशोधडीस लागला आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार,  ताडोबा व्याघ्र प्रकल्प येत्या एक ऑक्टोबरपासून (October) सुरू होणार आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एक ऑक्टोबरपासून ताडोबा प्रकल्प सुरू होत असल्याने रिसॉर्ट (Resort) , होम स्टे (Home stay)  आणि स्थानिक दुकाने (Shops) पुन्हा सुसज्ज करण्याचे काम सुरू झाले असून, जिप्सीमालकही वाहनांना तयार करीत आहेत. काळजी घेऊन हे सगळे करायचे आहे. त्यादृष्टीने ताडोबा व्यवस्थापनही सज्ज आहे. पर्यटक, रोसॉर्टमालक, जिप्सीचालक या सगळ्यांसाठी नियमावली तयार करण्यात आली असून, मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे, असे राघवेंद्र मून यांनी सांगितले.

पावसाळ्यात हा प्रकल्प तीन महिने बंद असतो आणि हिवाळ्यात प्राणीविश्व फार दिसत नसल्याने पर्यटक फार येत नाहीत. त्यामुळे जानेवारी ते जून हे सहा महिनेच इथे आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे ताडोबासह इतरही पर्यटन क्षेत्र विकसित करून रोजगार उपलब्ध करणे गरजेचे आहे. असे बंडू धोतरे यानी सांगितले.