क्रुरपणाचा कळस! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…

चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सावली तालुक्यातील पाथरी गावात घडली आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ही अडीच वर्षाची चिमुरडी घराबाहेर खेळायला गेली होती. परंतु काही वेळानंतर ती अचानक रडू लागली. त्यामुळे आईने तिची चौकशी केली. परंतु पीडितेच्या घराशेजारी राहणाऱ्या एका ४५ वर्षीय नराधमाने त्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार केला होता. त्यामुळे ती पीडित मुलगी घरी रडत आली होती. त्यानंतर आईने त्या मुलीची चौकशी केली असता तिला ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली.

या गंभीर प्रकरणानंतर पीडितेच्या आईने तातडीने पाथरी येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर नराधम आरोपी जितेंद्र मेश्राम याच्याविरोधात तक्रार केली. त्यांनंतर पोलिसांनी या आरोपीची चाचपणी आणि चौकशी केली असता पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे.