वडिलांच्या पार्थिवाला मुलींनी दिला खांदा; जातपंचायतीच्या विरोधाला पुरोगागी मुलींचे असेही प्रत्युत्तर

देशात कायद्याचे राज्य (Despite the rule of law) असले तरी काही जातींमध्ये जातपंचायतीचे वर्चस्व (caste dominance) कायम असल्याचे आढळून येते. जात पंचायतीच्या निर्णयाविरुद्ध जाणाऱ्याला वाळीत टाकण्याचे प्रकार आजही पुरोगामी महाराष्ट्रात (progressive Maharashtra) पहायला मिळतात. याचाच प्रयत्न चंद्रपूर जिल्ह्यात आला.

    चंद्रपूर (Chandrapur).  देशात कायद्याचे राज्य (Despite the rule of law) असले तरी काही जातींमध्ये जातपंचायतीचे वर्चस्व (caste dominance) कायम असल्याचे आढळून येते. जात पंचायतीच्या निर्णयाविरुद्ध जाणाऱ्याला वाळीत टाकण्याचे प्रकार आजही पुरोगामी महाराष्ट्रात (progressive Maharashtra) पहायला मिळतात. याचाच प्रयत्न चंद्रपूर जिल्ह्यात आला. जेथे समाजाने वाळीत टाकलेल्या प्रकाश ओगले यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलींनी (daughters) खांदा देत आपले अखेरचे कर्तव्य पार पाडले.

    मृत प्रकाश ओगले हे गोंधळी समाजातील. जातीची चैकट ओलांडून त्यांनी इतर जातीतील मुलीशी विवाह केला होता. यामुळे गोंधळी समाजातील काही दबंगांनी त्यांना वाळीत टाकले. त्यांच्या कुटुंबीयांशी असलेले सर्व नाते तोडून टाकले. प्रकाश ओगले यांनी सामाजिक बहिष्काराला न जुमानता स्वाभिमानाने संसार केला. आ त्यांना 7 मुली आणि दोन मुलगेसुद्धा आहेत.

    ओगले परिवार जुनी भांडी विकून उदरर्निवाह करीत होता. त्यांच्या मृत्यूनंतर पार्थिवाला खांदा देण्याचे समाजाने नाकारले. अखेर मुलीनीच वडीलांचा मृतदेह खांद्यावर उचलून स्मशानभूमीत नेले. जातीच्या विखळ्यातून भारतीय समाज अद्यापही मुक्त झालेला नाही. याचा प्रत्यय चंद्रपूरमध्ये घडलेल्या घटनेने पुन्हा समोर आला आहे.