दारु विक्रेत्याने केली चक्क वडेट्टीवार यांची आरती; कारण ऐकल्यावर व्हाल हैराण-परेशान

या जिल्ह्यात श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती अभियानाच्या माध्यमातून अ‍ॅड. परोमिता गोस्वामी यांनी दारूबंदी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली होती.

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षांनंतर मद्यविक्री सुरू झाली आहे. दारूविक्री सुरू होताच मद्य विक्रेत्यांनी आपआपल्या पद्धतीने हा आनंद साजरा केला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची चंद्रपूर जिल्ह्यातील दारूविक्री उठविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे एका बार मालकाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र बिअर बारमध्ये लावून त्यांची आरती केली. वडेट्टीवार यांच्या आरतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    या जिल्ह्यात श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती अभियानाच्या माध्यमातून अ‍ॅड. परोमिता गोस्वामी यांनी दारूबंदी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली होती. ६ वर्षे दारूबंदी असल्यामुळे दारू विक्रेते अडचणीत होते. दरम्यान त्यांना दिसाला मिळाला आहे. जिल्ह्यातील दारूबंदी विजय वडेट्टीवार यांनी उठवली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा अच्छे दिन आले, अशी भावना दारू विक्रेत्यांनी बोलून दाखवली आहे. मद्यप्रेमींनी मागील ३ दिवसात तब्बल १ कोटींची दारू रिचवल्याची माहिती आहे, याचाच आनंद म्हणून ग्रीन पार्क बारचे मालक गणेश गोरडवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या छायाचित्राची आरती केली. जो आमचे पोट भरतो तोच आमचा देव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दारूविक्रेत्यांच्या जीवनात वडेट्टीवार यांनी पुन्हा आनंद भरला आहे, त्यांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया गोरडवार यांनी दिली आहे. वडेट्टीवार यांच्या आरतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    the liquor dealer performed the aarti of wadettiwar ban was lifted