मूलमध्ये सराफा बाजार पाच दिवस बंद

 मूल. कोरोना महामारीचा वाढता उद्रेक लक्षात घेता मूळ येथीळ सराफा व्यापारी असोसिएशनने आपली प्रतिष्ठाने पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर येथील सराफा व्यापार्‍यांनीसुद्धा आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. त्याच धर्तीवर मूळ सावळी येथील सराफा व्यापारी असोसिएशननेसुद्धा निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या ‘पाच दिवसाच्या कालावधित सराफाव्यापारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवणार आहेत. कोरोनाविषाणूचा अधिक संसर्ग होऊ नये आणि नागरिकांनीसुद्धा प्रतिष्ठानात येऊन गर्दी करू नये, या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सराफा बाजार पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.