gosekhurd dam

चंद्रपूर. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या ( Gosikhurd Dam)  पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे ३ दरवाजे (Three gates) शुक्रवारी दुपारी १२ वाजता ०.५० मीटर पर्यंत उघडले गेले आहेत. वैनगंगा नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

३ दरवाजे उघडल्यामुळे धरणातून ताशी १६० क्युमेक्स पाणी सोडले जात आहे. गेल्या महिन्यात गोसीखुर्द धरणाचे सर्व ३ ३३ दरवाजे कोणत्याही सूचना न देता उघडण्यात आले होते, गडचिरोली आणि वैनगंगा नदीकाठी चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावात पूरस्थिती होती. त्यामुळे आता प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी माहिती दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.